God
God चा उल्लेख असलेली वचने
यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.
तो दिवस अंधकार असा होवो; वर राहणाऱ्या परमेश्वरासही त्याचे ध्यान न राहो; त्या दिवसावर प्रकाश न पडो.
ज्याचा मार्ग गुपित आहे, ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे अशा मनुष्याला जीवन का दिले आहे?
परमेश्वराच्या श्वासाने ते नष्ट होतात; त्यांच्या क्रोधाची केवळ एक फुंकर त्यांना नाहीसे करते.
‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,
“मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.
परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून; व बलवानांच्या तावडीतून वाचवितात.
“परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.
कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.
दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.
सर्वसमर्थाचे बाण माझ्यात शिरले आहेत, त्या बाणांचे विष माझा आत्मा पिऊन टाकतो; परमेश्वराचा आतंक माझ्याविरुद्ध उभा आहे.
“अहा! जर मी मागितलेले मला मिळाले, ज्याची मी आशा करतो ते परमेश्वराने दिले,
की परमेश्वराने त्यांच्या इच्छेनुसार मला चिरडून टाकावे, आपला हात ढिला सोडून माझ्या जिवाचा नाश करावा!
तरीही हे मला सांत्वनच असणार— आणि तीव्र क्लेशातही माझा आनंद असणार— कारण त्या परमपवित्रांची वचने मी धिक्कारली नाहीत.
“जो कोणी मित्रावर दया करण्यापासून स्वतःस आवरतो त्याने सर्वसमर्थाचे भय सोडून दिले आहे.
मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का, की तुम्ही माझ्यावर पहारा करावा?
तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,
“मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे, व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,
दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी?
माझ्यावरची तुमची नजर कधीही वळवणार नाही का, एकही क्षण मला एकटे सोडणार नाही का?
जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते, त्या तुमचे मी काय केले? माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे? मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?
माझ्या अपराधांची क्षमा करून माझ्या पापांची गय का करीत नाही? कारण लवकरच मी धुळीत पडणार आहे, तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी अस्तित्वात नसेन.”
परमेश्वर न्याय विपरीत करतात काय? सर्वसमर्थ जे योग्य आहे त्याचा विपर्यास करतात काय?
जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले, म्हणून परमेश्वराने त्यांच्या पापाची त्यांना शिक्षा केली.