मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जल पाषाण झिजवून टाकते व पूर माती वाहून नेतो, त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता.

  2. तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो; तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता.

  3. परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो.

  4. परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का?

  5. परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?

  6. यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे?

  7. जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही,

  8. कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,

  9. त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.

  10. परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे.

  11. मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे. माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे. त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे;

  12. त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत. दया विरहित ते माझी आतडी छेदतात आणि माझे पित्त भूमीवर ओततात.

  13. पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.

  14. माझा मध्यस्थ माझा मित्र आहे आणि परमेश्वरासमोर माझे नेत्र अश्रू गाळतात;

  15. एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी तसाच तो एका मनुष्याच्या वतीने परमेश्वराजवळ विनवणी करतो.

  16. “हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. कारण मला जामीन आणखी कोण आहे?

  17. तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे; म्हणून तुम्ही त्यांना विजयी होऊ देणार नाही.

  18. पातक्यांचे जीवन खचितच असे असते; परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.”

  19. तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे.

  20. मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे; त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत.

  21. माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे; झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे.

  22. त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे; आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे.

  23. “माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा, कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे.

  24. परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता? माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय?

  25. आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;