मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.

  2. जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार, तेव्हा परमेश्वराचा प्रचंड कोप त्याच्याविरुद्ध पेटेल आणि त्याच्यावर त्यांच्या क्रोधाची वृष्टी होईल.

  3. त्याचे घर पुराने वाहून जाईल, परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्याची सर्व संपत्ती पाण्याच्या ओघात नष्ट होईल.

  4. दुष्ट मनुष्याचा परमेश्वराने हाच वाटा नेमलेला आहे, परमेश्वराने त्यांच्याकरिता नेमलेला वारसा तो हाच आहे.”

  5. त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात; परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.

  6. तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.

  7. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  8. “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?

  9. असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’ दुर्जनालाच स्वतःच्या पापाची परतफेड करू द्यावी, म्हणजे त्याला त्याचा अनुभव येईल!

  10. आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे; सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा.

  11. “परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?

  12. “मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?

  13. जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?

  14. “तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का?

  15. “परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय? आणि अतिउंच असलेल्या त्या तार्‍यांकडे बघ!

  16. पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत? निबिड अंधकारातून ते न्याय करतील काय?

  17. ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात तेव्हा त्यांनी आम्हाला बघू नये म्हणून दाट ढगांनी त्यांच्यावर पडदा टाकला आहे.’

  18. ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’

  19. तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली, म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो.

  20. “परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.

  21. त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव.

  22. जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.

  23. तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.

  24. मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्‍ये आनंद पावशील व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.

  25. तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.