God
God चा उल्लेख असलेली वचने
जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’ जे पडलेले ते वाचविले जातील.
परमेश्वर कुठे आढळेल हे जर मला माहीत असते; मी जर त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ शकलो असतो!
तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता माझी बाजू त्यांच्यापुढे सविस्तर मांडली असती.
ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन, आणि त्यांचे म्हणणे मी स्वीकारेन.
मोठ्या जोमाने ते माझा विरोध करतील काय? नाही, ते नक्कीच मला दोष लावणार नाहीत.
सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो, आणि माझ्या न्यायाधीशापासून सर्वकाळासाठी माझी सुटका होईल.
“परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही; आणि पश्चिमेकडे गेलो, तिथेही ते मला सापडत नाहीत.
जेव्हा ते उत्तरेकडे कार्यरत असतात, तरी मला ते दिसत नाहीत; जेव्हा ते दक्षिणेकडे वळतात, तेव्हा मला ते ओझरतेही दिसत नाहीत.
परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्यासारखा मी प्रमाणित होईन.
माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे; दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे.
मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही; माझ्या दररोजच्या अन्नापेक्षा त्यांच्या तोंडचे शब्द मला मौल्यवान आहेत.
“परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे? त्यांच्या मनास येईल तसेच ते करतात.
माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील, आणि अशा पुष्कळ योजना त्यांनी माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत.
म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते; जेव्हा या सर्वांचा मी विचार करतो, तेव्हा मला त्यांचा दरारा वाटतो.
परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे; सर्वसमर्थाने मला भीतीने जखडले आहे.
निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो, परंतु तो मला गप्प करू शकला नाही.
“सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही? जे त्यांना ओळखतात त्यांनी त्या दिवसांची व्यर्थ वाट का पाहावी?
मरणासन्न असलेल्यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते, आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे. तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही.
आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले, तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते.
“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.
त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय? आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?
मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?
जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,
मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे; त्यांच्या दृष्टीपासून नाश लपलेला नाही.
आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.