Skip to content

Uprightness बद्दल बायबलमधील वचने

60 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.

  2. ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,

  3. कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;

  4. सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.

  5. याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.

  6. नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.

  7. नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.

  8. नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो.

  9. याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात, परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात.

  10. दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते.

  11. नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.

  12. जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो.

  13. दुष्टांचे घर नाश केले जाईल, परंतु नीतिमानाचा तंबू समृद्ध होईल.

  14. याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.

  15. मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो.

  16. सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो; जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते.

  17. विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा, निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे.

  18. दुष्ट निर्भयतेचा आव आणतो, पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो.

  19. विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा.

  20. जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल.

  21. जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल.

  22. हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो.

  23. ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, तर मोठेपणी तो उद्धट होईल.

  24. एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”

  25. चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. मैत्रिणी आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. नायिका त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!