Skip to content

Uprightness बद्दल बायबलमधील वचने

60 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नीतिमानाचा मार्ग समतल असतो; तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.

  2. जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—

  3. ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.

  4. जे नीतिमार्गाने चालतात ते शांती पावतात; त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.

  5. असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्‍यांचा द्वेष आणि सत्य बोलणार्‍यांचा तिरस्कार करतात.

  6. हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?

  7. पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे; एकही प्रामाणिक मनुष्य उरला नाही. प्रत्येकजण रक्तपात करण्यात गुंतला आहे; ते सापळा रचून एकमेकांची शिकार करतात.

  8. त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.

  9. “बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.

  10. जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस?