मुख्य मजकुरावर जा

Tribe Of Benjamin बद्दल बायबलमधील वचने

107 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांना याबेश-गिलआद येथे राहणार्‍या लोकांमध्ये चारशे तरुण स्त्रिया आढळल्या ज्या कधीही पुरुषांसोबत निजल्या नव्हत्या आणि त्यांनी त्यांना कनान देशातील शिलोह येथील छावणीत आणले.

  2. मग संपूर्ण सभेने बिन्यामीन गोत्राकडे जे रिम्मोन खडकावर राहत होते, निरोप पाठवून त्यांच्याकडे शांतीची बोलणी केली.

  3. बिन्यामीन लोक त्यावेळेस परत आले आणि याबेश-गिलआद येथील उर्वरित स्त्रिया त्यांना पत्नी म्हणून देण्यात आल्या आणि मग ते आपापल्या घरी परतले. परंतु त्या त्यांना पुरेसा नव्हत्या.

  4. बिन्यामीन गोत्रासाठी लोकांनी दुःख केले, कारण याहवेहने इस्राएलांच्या गोत्रांमध्ये दरी निर्माण केली.

  5. आणि सभेतील वडिलांनी म्हटले, “बिन्यामीन स्त्रियांचा संहार केल्यामुळे जे पुरुष उरले आहेत त्यांना पत्नी कशी मिळवून द्यावी?

  6. उरलेल्या बिन्यामीन लोकांना वारस मिळालेच पाहिजे, म्हणजे इस्राएलच्या एका गोत्राचा नाश होणार नाही.

  7. आपण आपल्या कन्या त्यांना देऊ शकत नाही. कारण आपण इस्राएली लोकांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे: ‘जो कोणी बिन्यामीनास पत्नी करून देईल, तो शापित होईल.’

  8. आणि मग ते म्हणाले, पाहा, शिलोह येथे याहवेहचा उत्सव दरवर्षी असतो, तो बेथेलाच्या उत्तरेस आहे, जो रस्ता बेथेलापासून वर शेखेमास जातो त्याच्या पूर्वेकडे आणि लबोनाहच्या दक्षिणेस आहे.”

  9. म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना अशी सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा

  10. आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकएका तरुणीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे.

  11. आणि जेव्हा त्यांचे वडील आणि भाऊ गार्‍हाणे घेऊन आमच्याकडे येतील, तेव्हा आम्ही त्यांना म्हणू, ‘आमच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी, कारण युद्धात आम्हाला त्यांच्यासाठी पत्नी मिळाली नाही. तुम्ही तुमची शपथ मोडल्याबद्दल दोषी ठरणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कन्या त्यांना दिल्या नाहीत.’ ”

  12. यासाठी बिन्यामीन लोकांनी हे केले. जेव्हा तरुण स्त्रिया नाचत होत्या, तेव्हा प्रत्येक पुरुषाने एकी एकीला धरले आणि तिला आपली पत्नी म्हणून घेऊन गेले. ते परत आपल्या वतनात आले आणि त्यांनी नगरे परत बांधली आणि ते त्यात राहू लागले.

  13. शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते:

  14. “याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएली लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”

  15. जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.”

  16. त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

  17. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  18. शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.

  19. बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.

  20. बेलाचे पुत्र: एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.

  21. बेकेराचे पुत्र: जमीराह, योआश, एलिएजर, एलिओएनाइ, ओमरी, यरेमोथ, अबीयाह, अनाथोथ व अलेमेथ.

  22. ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते.

  23. यदिएलाचा पुत्र: बिल्हान. बिल्हानाचे पुत्र: यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.

  24. हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.

  25. ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.