मुख्य मजकुरावर जा

Tribe Of Benjamin बद्दल बायबलमधील वचने

107 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते.

  2. तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे. इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर भरवसा होता.

  3. जे दबा धरून बसलेले होते त्यांनी अचानक गिबियाहवर हल्ला केला आणि ते शहरात पसरले आणि पूर्ण शहराचा तलवारीने नाश केला.

  4. इस्राएली लोक आणि दबा धरून बसलेले यांच्यात अशी सांकेतिक खूण ठरली होती की शहरातून धुराचा मोठा लोट वर चढेल असे करावे,

  5. आणि मग इस्राएली लोक पलटवार करतील. बिन्यामीन लोकांनी इस्राएली पुरुष (सुमारे तीस) ठार केले आणि ते म्हणाले, “आपण त्यांचा पहिल्या युद्धाप्रमाणेच पराभव करीत आहोत.”

  6. परंतु जेव्हा शहरातून धुराचा लोट वर चढू लागला, तेव्हा बिन्यामीन लोकांनी मागे वळून पाहिले आणि संपूर्ण शहरातून धुराचा लोट वर आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले.

  7. नंतर इस्राएली लोकांनी पलटवार केला आणि बिन्यामीन लोक घाबरून गेले आणि त्यांना कळून आले की त्यांच्यावर भयंकर संकट आले आहे.

  8. म्हणून ते इस्राएली लोकांपुढून रानाकडे पळू लागले, परंतु युद्धापासून वाचू शकले नाही. आणि इस्राएली लोकांनी ते ज्या नगरातून निघाले होते त्यांना तिथेच ठार मारले.

  9. त्यांनी बिन्यामीन लोकांचा पाठलाग करीत गिबियाहच्या पूर्वेस त्यांना वेढले आणि त्यांना सहज तुडविले.

  10. बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते.

  11. जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले.

  12. त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवारधारक मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते.

  13. पण त्यापैकी सहाशे पुरुष वळले आणि रानात रिम्मोन खडकावर पळून गेले आणि तिथे ते चार महिने राहिले.

  14. मग इस्राएली पुरुष परत बिन्यामीन लोकांकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण नगर व पशू आणि त्यांना जे मिळाले त्या सर्वांना तलवारीने मारले. जी नगरे त्यांना आढळली त्या सर्वांना त्यांनी जाळून भस्मसात केले.

  15. इस्राएलांच्या पुरुषांनी मिस्पाह येथे प्रतिज्ञा केलेली होती: “आपल्यापैकी कोणीही आपल्या कन्यांना बिन्यामीन गोत्रांना विवाहात देणार नाही.”

  16. ते बेथेल येथे गेले, जिथे संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर बसून त्यांनी उच्चस्वरात शोक केला.

  17. “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर,” ते आक्रंदून म्हणाले, “इस्राएल सोबत असे का घडले? आज इस्राएलातील एक गोत्र का कमी झाले?”

  18. मग दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून, त्यांनी तिथे वेदी बांधली आणि तिच्यावर होमार्पण व शांत्यर्पणे अर्पिली.

  19. नंतर इस्राएली लोकांनी हे विचारले, ते एकमेकास विचारू लागले, “इस्राएलाच्या सर्व गोत्रांमधून असा कोणी आहे, जो या सभेत याहवेहसमोर आला नाही?” कारण त्यांनी गंभीरतेने शपथ घेतली होती की, जो कोणी मिस्पाह येथे याहवेहसमोर उपस्थित राहणार नाही, त्याला अवश्य जिवे मारावे.

  20. सर्व इस्राएली लोक त्यांचा बंधू बिन्यामीन गोत्राबद्दल दुःखी झाले. ते म्हणाले, “आज इस्राएलांच्या एका गोत्राचा उच्छेद झाला आहे.

  21. आता जे उरले आहेत त्यांच्यासाठी पत्नी मिळवून देण्यास काय करावे? कारण आपण तर याहवेहची शपथ घेऊन म्हटले आहे की विवाहात त्यांना आपण आपल्या कन्या देणार नाही.”

  22. नंतर त्यांनी विचारले “मिस्पाह येथे याहवेहसमोर इस्राएलचा कोणता गोत्र आला नव्हता?” तेव्हा त्यांना कळून आले की, याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही हजर नव्हते.

  23. कारण जेव्हा त्यांनी लोकांची मोजणी केली, त्यांना आढळून आले की याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही तिथे नव्हते.

  24. म्हणून सभेने बारा हजार योद्ध्यांना सूचना देऊन याबेश-गिलआद येथे पाठविले आणि त्यांनी जाऊन तिथे राहणार्‍यांचा, स्त्रियांचा आणि लेकरांचा तलवारीने संहार करावा.

  25. तुम्हाला हे करावयाचे आहे ते म्हणाले, “सर्व पुरुष आणि स्त्रिया ज्या कुमारिका नाहीत त्या सर्वांना तुम्ही मारावे.”