मुख्य मजकुरावर जा

Tribe Of Benjamin बद्दल बायबलमधील वचने: Almost annihilated for protecting the men of Gibeah

37 वचने · 35 पैलू

Almost annihilated for protecting the men of Gibeah बद्दल वचने

  1. मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे?

  2. गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” परंतु बिन्यामीन लोक आपल्या इस्राएली भाऊबंदाचे ऐकेनात.

  3. बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले.

  4. बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले.

  5. या सर्व सैनिकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावखुरे होते. ते एवढे नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभरदेखील चुकत नसे.

  6. बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते.

  7. इस्राएली लोक वर बेथेल येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”

  8. इस्राएली लोक दुसर्‍या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला.

  9. मग इस्राएली लोक बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली.

  10. बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले.

  11. परंतु इस्राएली लोकांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले आणि पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी मोर्चा दिला होता, दुसर्‍या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोर्चा दिला.

  12. इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?” याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”

  13. दुसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला.

  14. या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.

  15. मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली.

  16. आणि इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले. (त्या समयी परमेश्वराचा कराराचा कोश तिथे होता,

  17. एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”

  18. तेव्हा इस्राएलने गिबियाहच्या सभोवती दबा धरणारे बसविले.

  19. तिसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली.

  20. बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली.

  21. मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.”

  22. सर्व इस्राएली लोक आपल्या ठिकाणाहून उठले आणि बआल-तामार येथे युद्धाची व्यूहरचना केली आणि इस्राएली लोक गेबाच्या पश्चिमेला दबा धरून बसले होते.

  23. मग इस्राएलातील निवडलेले दहा हजार तरुण पुरुषांनी गिबियाहवर हल्ला केला. युद्ध एवढे भयंकर झाले की आपल्यावर मोठा अनर्थ येऊन ठेपला आहे, याची बिन्यामीन लोकांना काही कल्पना नव्हती.

  24. तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते.

  25. तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे. इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर भरवसा होता.