Tribe Of Benjamin बद्दल बायबलमधील वचने: Furnished the first king to Israel
Furnished the first king to Israel बद्दल वचने
शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते:
“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएली लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”
जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.”
त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.
त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.
शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.