मुख्य मजकुरावर जा

The Stars बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.

  2. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.

  3. आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.

  4. आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे त्यांचा प्रकाश देणार नाहीत. उगवता सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही.

  5. तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा: हे सर्व कोणी निर्माण केले आहे? एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे, आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात. त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे त्यातील एकही कधी हरवत नाही.

  6. तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! तुझे ज्योतिषी पुढे येवोत, नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.

  7. आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.

  8. यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”

  9. याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्‍या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:

  10. “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात.

  11. “याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात:

  12. ज्याप्रमाणे आकाशातील तारे मोजता येत नाहीत व समुद्र किनार्‍यावरील वाळूचे मापन करता येत नाही, त्याचप्रमाणे माझा सेवक दावीद याचे वंशज आणि माझी सेवा करणाऱ्या लेवी वंशज यांना मी असंख्य करेन.’ ”

  13. जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन आणि त्यातील तारे अंधुक करेन; सूर्याला मी ढगांनी आच्छादेन आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.

  14. तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.

  15. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.

  16. पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.

  17. सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.

  18. ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— याहवेह, हे त्यांचे नाव आहे.

  19. तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा, तुमच्या काइवान मूर्तीची बैठक, तुमच्या दैवताचा तारा उंचाविला; जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला.

  20. तू गरुडांप्रमाणे उंच भरार्‍या मारीत असलास किंवा आपले घरटे तार्‍यांमध्ये बांधत असलास, तरी तिथून मी तुला खाली आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.

  21. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”

  22. राजाचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर ते शास्त्रज्ञ पुढे निघाले, जो तारा त्यांनी पाहिला होता, तो तारा बालक जिथे होता, तिथे येईपर्यंत त्यांच्यापुढे चालला.

  23. तुम्ही मोलेख दैवताचा मंडप आणि शक्कुथ व तार्‍यांचे दैवत रेफान, उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या. म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’

  24. त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली.

  25. सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.