Skip to content

Sisera

17 वचने

Sisera चा उल्लेख असलेली वचने

  1. म्हणून याहवेहने त्यांना कनानातील हासोर येथील राजा याबीनच्या हाती दिले. त्याच्या सैन्याचा सेनापती सिसेरा हा हरोशेथ-हग्गोईम येथे राहणारा होता.

  2. मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ”

  3. दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली.

  4. जेव्हा त्यांनी सिसेराला सांगितले की अबीनोअमाचा मुलगा बाराक ताबोर पर्वतावर गेला आहे,

  5. तेव्हा सिसेराने आपले सर्व लोक आणि आपले नऊशे लोखंडी रथ सज्ज करून, हरोशेथ-हग्गोईम येथून किशोन नदीकडे कूच केले.

  6. तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, “जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?” तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला.

  7. जसा बाराक पुढे गेला, याहवेहने सिसेरा आणि त्याचे सर्व रथ आणि त्याच्या सैनिकांचा तलवारीने धुव्वा उडविला, सिसेरा तर आपल्या रथातून उतरला आणि पायी पळून गेला.

  8. बाराकाने रथांचा आणि सैन्याचा हरोशेथ-हग्गोईमपर्यंत पाठलाग केला आणि सिसेराचे संपूर्ण सैन्य तलवारीने पडले; एकही पुरुष जिवंत राहिला नाही.

  9. सिसेरा तर केनी हेबेराची पत्नी याएलच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला, कारण हासोरचा राजा याबीन आणि केनी हेबेरच्या घराण्यात सलोखा होता.

  10. याएल सिसेराला भेटण्यास बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “या, महाराज, आत या. भिऊ नका.” म्हणून तो तिच्या डेर्‍यात गेला आणि तिने त्याला कांबळीखाली झाकले.

  11. बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्‍याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला.

  12. आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.

  13. तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला, उजवा हात कामगाराच्या हातोडीसाठी. तिने सिसेराला मारले, तिने त्याचे डोके चिरडले. तिने त्याच्या कपाळाचे भोसकून तुकडे केले.

  14. “खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले; जाळीच्या मागे ती ओरडली, ‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे? त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’

  15. ‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना: प्रत्येक पुरुषासाठी एक किंवा दोन स्त्रिया, सिसेरासाठी लूट म्हणून रंगीबेरंगी वस्त्रे, रंगीबेरंगी नक्षीदार वस्त्रे, माझ्या गळ्यात भरतकाम केलेली वस्त्रे— ही सर्व लूट म्हणून आहेत काय?’

  16. “परंतु याहवेह त्यांच्या परमेश्वरांना ते विसरले; म्हणून याहवेहने त्यांना हासोरचा सेनापती सिसेराच्या हाती आणि पलिष्ट्यांच्या हाती आणि मोआबच्या राजाच्या हाती विकून टाकले आणि ते त्यांच्याशी लढले.

  17. पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी, किंवा सिसेरा व किशोन नदीजवळ याबीनांशी व्यवहार केला, तसाच यांच्याशीही करा.