मुख्य मजकुरावर जा

The Roman Empire बद्दल बायबलमधील वचने

96 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.

  2. या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल.

  3. तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.

  4. तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल.

  5. मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते.

  6. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे.

  7. मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे.

  8. बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो.

  9. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.

  10. आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात.

  11. आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला.

  12. अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही.

  13. येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल,

  14. कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे.

  15. एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही.

  16. मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.

  17. पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.

  18. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.

  19. यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे.

  20. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.

  21. जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन.