मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Oppress

8 वचने · 92 पैलू

"The Poor" साठी शोधा

Oppress बद्दल वचने

  1. गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात.

  2. रानातील रानगाढवां प्रमाणे, गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात; पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो.

  3. ते रानातून चारा गोळा करतात आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात.

  4. पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते. थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते.

  5. पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात.

  6. पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते; ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात.

  7. पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात.

  8. गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो. तो इतरांना लुटतो. उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही. तो मूर्तींकडे आपली नजर लावतो. तो अमंगळ कृत्ये करतो.