The Poor बद्दल बायबलमधील वचने: Are blessed
Are blessed बद्दल वचने
तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य; याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील.
उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.
मी केलेल्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला निदर्शनास आणून दिले आहे की, अशाप्रकारे श्रम करून आपण अशक्तांना साहाय्य करावे व प्रभू येशू जे शब्द स्वतः बोलले होते ते स्मरणात ठेवा: ‘घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.’ ”