मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Oppression of-Illustrated

6 वचने · 92 पैलू

"The Poor" साठी शोधा

Oppression of-Illustrated बद्दल वचने

  1. नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब.

  2. श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती,

  3. परंतु गरीब मनुष्याकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढीशिवाय काहीच नव्हते. त्याने ती वाढवली, ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या लेकरांबरोबर वाढली. तिने त्याच्या अन्नामधून खाल्ले, त्याच्या प्याल्यातून पाणी प्याले आणि त्याच्या बाहूंमध्येच ती झोपी जात असे. त्याला ती आपल्या मुलीप्रमाणेच होती.

  4. “त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”

  5. हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे!

  6. त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.”