मुख्य मजकुरावर जा

The Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.

  2. पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे.

  3. संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.

  4. “हे होमार्पण येणार्‍या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.

  5. मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले.

  6. मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला.

  7. त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.

  8. दुसर्‍या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्‍हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.

  9. त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्‍यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.

  10. अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले.

  11. मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.

  12. कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;

  13. पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.

  14. मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.

  15. बैलाचे मांस माझा आहार आहे का किंवा बोकडांचे रक्त माझे पेय आहे का?

  16. “ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा!

  17. तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती,

  18. पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.

  19. ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते.

  20. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली.

  21. आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.