The Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने: At consecration of kings
At consecration of kings बद्दल वचने
दुसर्या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.
त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.
अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले.