Skip to content

Tact बद्दल बायबलमधील वचने

84 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योआबाने राजाला सन्मान व आशीर्वाद देण्यासाठी भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. योआब म्हणाला, “आज आपल्या सेवकास समजले की त्याच्या धनीराजाच्या नजरेत तो कृपा पावला आहे, कारण राजाने आपल्या सेवकाची विनंती मान्य केली आहे.”

  2. नगरातून एका शहाण्या स्त्रीने आवाज दिला, “ऐका! ऐका! योआबाला इकडे येण्यास सांगा म्हणजे मी त्याच्याशी बोलेन.”

  3. तेव्हा तो तिच्याकडे गेला, आणि तिने विचारले, “तू योआब आहेस काय?” तो उत्तरला, “होय, मीच आहे.” ती म्हणाली, “तुझ्या दासीला जे सांगायचे आहे ते ऐक.” “मी ऐकत आहे,” तो म्हणाला.

  4. ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे.

  5. आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?”

  6. यावर योआबाने उत्तर दिले, “मी त्याचा नाश किंवा त्याचा विध्वंस करावा हे माझ्यापासून अगदी दूर असो.

  7. पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य, जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”

  8. ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर कापून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला.

  9. तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली.

  10. नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.”

  11. ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!” परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!”

  12. तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”

  13. राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.

  14. एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती कोणालाही सांगितली नाही, कारण मर्दखयाने तिला ते सांगू नये असे बजावले होते.

  15. कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.

  16. सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते.

  17. सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का?

  18. तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका.

  19. तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही.

  20. जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात.

  21. जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.

  22. वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.”

  23. असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.

  24. त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत.

  25. तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्‍या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस.