Skip to content

Tact बद्दल बायबलमधील वचने

84 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील,

  2. तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत.

  3. तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.

  4. गैरयहूदी विश्वासणार्‍यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.”

  5. मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे.

  6. यहूदीयांना जिंकण्यासाठी मी यहूदीयांसारखा झालो. नियमशास्त्राधीन असणार्‍यांसाठी मीही नियमशास्त्राधीन झालो. वास्तविक मी नियमशास्त्राधीन नाही.

  7. ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे.

  8. जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे

  9. मी प्रौढी मिरवावी असे ठरविले तर तसे केल्याने मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी सत्य बोलत आहे, परंतु मी तसे करणार नाही. कारण मी करतो व बोलतो त्यापेक्षा कोणीही मला जास्त मानू नये, अशी माझी इच्छा आहे.