मुख्य मजकुरावर जा

Shoes बद्दल बायबलमधील वचने

36 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.

  2. म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, आणि गव्हाचा भुसाही विकायचा.

  3. योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.

  4. तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे.

  5. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”

  6. जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका.

  7. पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका.

  8. “परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला.

  9. तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.”

  10. मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.”

  11. परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.