मुख्य मजकुरावर जा

Sanitation बद्दल बायबलमधील वचने

289 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात उंचीचा थर पसरला.

  2. त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले.

  3. परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले.

  4. “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.

  5. त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.

  6. मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.

  7. “एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे,

  8. आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे.

  9. “जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.

  10. अशुद्ध व्यक्ती ज्या वस्तूला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल आणि जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करेल त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”

  11. “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.

  12. चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.”

  13. पण तुम्ही रक्ताचे सेवन कधीही करू नये; तर ते जमिनीवर पाण्यासारखे ओतून द्यावे.

  14. याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या वचनाप्रमाणे तुमच्या देशाची सीमा वाढविल्यावर, तुम्हाला मांस खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही म्हणाल, “मला मांस खावयाचे आहे,” तेव्हा तुम्ही मनसोक्त मांस खावे.

  15. याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या नावासाठी निवडलेले स्थान तुमच्या घरापासून खूप दूर असेल, तर तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा याहवेहने तुम्हाला दिलेल्या पशूंमधून किंवा मेंढरांमधून तुम्ही काहीही मारून खावे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मांस तुम्ही तुमच्या शहरात तुम्हाला हवे तेवढे खावे.

  16. जो कोणी विधिनियमानुसार शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्यानेही हे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात, त्याप्रमाणे खावे.

  17. परंतु रक्त सेवन न करण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी, कारण रक्त हे जीवन आहे, म्हणून तुम्ही मांसाबरोबर जीवन सेवन करू नये.

  18. तुम्ही रक्ताचे सेवन करू नये; त्याऐवजी ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे.

  19. त्याचे सेवन करू नये, तर त्याने तुमचे आणि तुमच्यानंतर तुमच्या संततीचे सर्व बाबतींत कल्याण होईल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य वाटणार्‍या गोष्टीच तुम्ही कराल.

  20. कोणतेही निषिद्ध ठरविण्यात आलेले अन्न तुम्ही खाऊ नये.

  21. तुम्ही हे प्राणी खाऊ शकता: बैल, मेंढरे व शेरडे,

  22. सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.

  23. ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  24. तरी, जे प्राणी फक्त रवंथ करतात अथवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले असतात, हे प्राणी तुम्ही खाऊ नयेत: उंट, ससा आणि रानससा; कारण हे प्राणी रवंथ करतात, परंतु त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते प्राणी तुमच्यासाठी विधिनियमानुसार अशुद्ध आहेत.

  25. डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये.