मुख्य मजकुरावर जा

Sanitation बद्दल बायबलमधील वचने

289 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता.

  2. परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.

  3. कोणतेही शुद्ध पक्षी खाण्यास योग्य आहेत.

  4. परंतु हे पक्षी तुम्ही खाऊ नये: गरुड, गिधाड, काळे गिधाड,

  5. लाल पतंग, काळे पतंग, निरनिराळ्या जातीच्या घारी,

  6. कोणत्याही जातीचे कावळे,

  7. शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,

  8. लहान घुबड, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड,

  9. वाळवंटी घुबड, कुरर, करढोक,

  10. करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.

  11. सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये.

  12. पण पंख असलेले कोणतेही पक्षी जे शुद्ध आहेत ते तुम्ही खाऊ शकता.

  13. आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्‍या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. त्याच्या आईच्या दुधात करडाला कधीही शिजवू नये.

  14. त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.

  15. ते तुम्ही आपल्याच नगरात खावे. हरिण किंवा सांबर खातात त्याप्रमाणेच, विधीनुसार अशुद्ध व शुद्ध यांनी ते खावे;

  16. परंतु तुम्ही त्याच्या रक्ताचे सेवन करू नये; तर ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून द्यावे.

  17. जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल,

  18. तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

  19. एखादा पुरुष स्वप्नावस्थेमुळे रात्रीतून अशुद्ध झाला असेल, तर त्याने छावणीबाहेर जावे आणि बाहेरच राहावे.

  20. पण जशी संध्याकाळ होईल तसे त्याने स्नान करावे व सूर्यास्तानंतर छावणीत परत यावे.

  21. नैसर्गिक विधी करण्यासाठी लागणारी जागा छावणीच्या बाहेर असावी.

  22. तुमच्या हत्यारांमध्ये कुदळ अवश्य असावी आणि बहिर्दिशेच्या वेळी आपल्या मलमूत्रासाठी त्याने खड्डा खोदावा व नंतर झाकून टाकण्यासाठी तिचा वापर करावा.

  23. कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा.

  24. “जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  25. “जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.