- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Sanitation बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘जर कोणी व्यक्ती दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—आपल्या शेजार्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—त्या व्यभिचारी आणि व्यभिचारिणी दोघांनाही जिवे मारावे.
“ ‘जो व्यक्ती आपल्या पित्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतो, तो आपल्या पित्याचा अपमान करतो. त्या व्यक्तीला व त्या स्त्रीला अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच माथी राहील.
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या सुनेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी जे केले ते विकृत आहे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
“ ‘जर एखादा पुरुष जसे एखाद्या स्त्रीसोबत तसे दुसर्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवतो, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केले आहे. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
“ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे.
“ ‘एखाद्या व्यक्तीने प्राण्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीला जिवे मारावे; त्या पशूलाही ठार करावे.
“ ‘जर एखादी स्त्री एखाद्या प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गेली तर ती स्त्री आणि तो प्राणी दोघांनाही मारून टाका. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील.
“ ‘एखादी स्त्री ॠतुमती असताना तिच्याबरोबर एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने तिच्या प्रवाहाचा स्त्रोत उघड केला आहे आणि तिने देखील ते उघड केले आहे. तर दोघांनाही समुदायामधून बहिष्कृत करावे.
“ ‘आईच्या किंवा वडिलांच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नका, कारण त्यामुळे जवळच्या नातेवाईकाचा अपमान होईल; त्यांना आपल्या पापाचा भार वाहावा लागेल.
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या भावाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने त्याच्या वडिलांच्या भावाचा अपमान केला आहे. त्यांना जबाबदार धरले जाईल; ते निःसंतान मरतील.
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीसोबत विवाह केला, तर ते अशुद्धपणाचे कृत्य होय; त्याने आपल्या भावाचा अपमान केला आहे. ते निःसंतान राहतील.
“ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,
किंवा जमिनीवर सरपटणार्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल.
अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.
सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.
मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे.
इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.
मग ते स्त्री असो किंवा पुरुष; त्यांना बाहेर पाठवावे. ज्या छावणीत मी तुमच्यामध्ये राहतो, ती त्यांच्यामुळे भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्यांना बाहेर पाठवावे.
त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले.
परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.
“इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,
“लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.
तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस,
परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”