Sanitation बद्दल बायबलमधील वचने: Carcases
Carcases बद्दल वचने
एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे.
मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”
तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली.
वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.
ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल.
पंजांवर चालणारा प्रत्येक प्राणी खाण्यास तुम्हाला मनाई आहे. अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा.
जमिनीवर सरपटणार्यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल.
त्यापैकी एखादा प्राणी मातीच्या पात्रात पडला, तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे.
अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा.
जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे.
जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते;
पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
“ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,
अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.
परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.
“इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,
“जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.
त्यांनी तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.
मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.