Skip to content

Resignation बद्दल बायबलमधील वचने

132 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला.

  2. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, “तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!”

  3. यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.

  4. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  5. “समजा कोणी परमेश्वराला म्हटले, ‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.

  6. भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह

  7. दावीदाचे स्तोत्र. दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.

  8. कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील, हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील.

  9. याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.

  10. याहवेहमध्ये आनंद कर, म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील.

  11. तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:

  12. तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल, तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल.

  13. याहवेहसमोर निश्चिंत राहा व धीराने त्यांची वाट पाहा; जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते, त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.

  14. तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको; हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील.

  15. दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.

  16. थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांना शोधूनही ते तुला सापडणार नाहीत.

  17. परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील.

  18. मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे.

  19. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.

  20. हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

  21. ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”

  22. ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत.

  23. हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली;

  24. माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;

  25. मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो?