मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने

726 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.

  2. नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का?

  3. असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही.

  4. पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.”

  5. त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला.

  6. त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले.

  7. पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.”

  8. “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  9. परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले.

  10. मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.

  11. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.

  12. तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल.

  13. तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.”

  14. “कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.

  15. कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही.

  16. ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”

  17. येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.”

  18. जसे ते यरुशलेमजवळ आले आणि ते शहर पाहिले, त्यावरून ते रडले आणि म्हणाले,

  19. “जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टिआड झाल्या आहेत.

  20. परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”

  21. शिमोन म्हणाला, “प्रभूजी, आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व जीव देण्याचीही माझी तयारी आहे.”

  22. योहानाचे बोलणे ऐकून ज्यांनी येशूंना अनुसरले होते, त्या दोन शिष्यांमधील एक आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ होता.

  23. आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की त्याने त्याचा भाऊ शिमोन याला शोधले आणि त्याला सांगितले, “आम्हाला मसिहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे.”

  24. मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला. येशूंनी त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा, म्हणजे खडक असे म्हणतील.” भाषांतर केल्यानंतर पेत्र.

  25. मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.”