मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने

726 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन, म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील.

  2. परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्‍यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला

  3. तुमच्याकरिता माझी विटंबना झाली आहे, माझे मुख लज्जेने व्याप्त झाले आहे.

  4. माझ्या कुटुंबासाठी मी परका आहे, माझी सख्खी भावंडेही मला ओळखत नाही.

  5. तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, आणि त्यांनी केलेला तुमचा अपमान माझ्यावर पडला आहे.

  6. परमेश्वरा, तारुण्यापासून तुम्ही मला शिकवीत आलेले आहात, आणि आजपर्यंत मी तुमच्या अद्भुतकृत्यांना जाहीर करीत आहे.

  7. आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना, परमेश्वरा, माझा त्याग करू नका; तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या.

  8. हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार? तुमच्या नावाची निंदा शत्रू सर्वकाळ करणार काय?

  9. याहवेह, पाहा हे शत्रू तुमची कशी थट्टा करीत आहेत; उन्मत्त राष्ट्राने तुमच्या नावाची कशी निंदा केली आहे, याचे स्मरण करा.

  10. आपल्या कबुतराचे जीवन हिंसक श्वापदाच्या हाती देऊ नका; आपल्या पीडित प्रजेचे जीवन कायमचे विसरू नका.

  11. तुमच्या कराराचे स्मरण करा, कारण पृथ्वीवरील काळोखाचे प्रदेश हिंसेची स्थाने झाली आहेत.

  12. पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका; दरिद्री आणि दुःखी तुमच्या नावाची स्तुती करोत.

  13. परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा; मूर्ख तुमची दिवसभर अवहेलना करीत असतात, याची आठवण ठेवा.

  14. तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या शत्रूंचा कोलाहल क्षणोक्षणी वाढतच आहे.

  15. माझ्यातर्फे दुष्ट लोकांविरुद्ध कोण उभा राहील? कुकर्मी लोकांविरुद्ध माझ्याकडून कोण लढेल?

  16. याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.

  17. सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.

  18. राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.” सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील.

  19. दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.

  20. आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो.

  21. इतर राष्ट्र असे का म्हणतात, “यांचा परमेश्वर कुठे आहे?”

  22. संताप मला व्यापून टाकतो, कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत.

  23. हे याहवेह, तुम्ही कृती करण्याची वेळ आली आहे; तुमच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

  24. माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे.

  25. माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात.