मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने

253 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, शोक आणि घोर आकांत, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.”

  2. त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.

  3. “तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’ निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.

  4. “हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल,

  5. बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.

  6. “इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले.

  7. हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील.

  8. “परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.”

  9. मी सर्व राष्ट्रे हलवेन आणि सर्व राष्ट्रांची जी इच्छा आहे ते येईल आणि मी गौरवाने हे स्थान भरेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  10. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, ‘सध्याच्या या भवनाचे वैभव पहिल्या भवनाच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल, या स्थळात मी शांती बहाल करेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.”

  11. तो याहवेहचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली वस्त्र परिधान करेल आणि राजासनावर बसेल व राज्य करेल. तो त्याच्या सिंहासनावर याजक होईल आणि या दोघात समन्वय होईल.’

  12. सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!

  13. मी म्हणालो, “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझे वेतन द्या; पण तुम्हाला वाटत नसेल तर देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला चांदीची तीस नाणी दिली.

  14. मग याहवेहने मला सांगितले, “ही नाणी कुंभारापुढे फेकून दे,” त्यांनी माझ्यासाठी किती भारी मोल ठरविले! मग मी ती चांदीची तीस नाणी घेतली व ती याहवेहच्या भवनातील कुंभारापुढे फेकली.

  15. “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.

  16. “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”

  17. “मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  18. अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.

  19. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”

  20. प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले.

  21. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).

  22. येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले.

  23. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”

  24. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले.

  25. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?”