- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Penitent बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय?
आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल.
त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.
“परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.
“न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय होणार नाही. दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरविण्यात येणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल.
“मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.
कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
“तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल?
किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल?
तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!”
आणि प्रत्येकजण जो मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही.
“समजा, एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय?
ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल
आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’
त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.
“एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी असून त्यातील एक हरवले, तर ती दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय?
ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’
त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”
येशू पुढे म्हणाले, “एका मनुष्याला दोन पुत्र होते.
त्यातील धाकटा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतील माझा वाटा मला द्या’ त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली मालमत्ता त्यांच्यामध्ये वाटून दिली.
“काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला, तिथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला.
सर्वकाही खर्च करून झाल्यानंतर, त्या संपूर्ण देशामध्ये कडक दुष्काळ पडला आणि त्याला प्रत्येक वस्तूची उणीव भासू लागली.
तेव्हा तो स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले.
शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.
“शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे.