Skip to content

Penitent बद्दल बायबलमधील वचने

131 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”

  2. “पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही.

  3. पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्याच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जी नीतिमान कृत्ये त्याने केली आहे त्यामुळे तो खचितच जगेल.

  4. दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  5. “मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’

  6. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’

  7. “म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’

  8. जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील.

  9. आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले;

  10. गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.

  11. पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील.

  12. धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल.

  13. ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील.

  14. पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.

  15. “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.

  16. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.

  17. “जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल असा तुम्हामध्ये कोण आहे?

  18. किंवा मासा मागितला, तर साप देईल?

  19. जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील?

  20. “जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.

  21. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.

  22. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”

  23. जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.

  24. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.

  25. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे.