मुख्य मजकुरावर जा

Nation बद्दल बायबलमधील वचने

183 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;

  2. जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे;

  3. तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.

  4. “त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’

  5. हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल!

  6. माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’

  7. “म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग: “ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील; त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध. द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील,

  8. हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” याहवेहची ही घोषणा आहे.

  9. सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “पाहा! विपत्ती पसरत आहे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात; पृथ्वीच्या टोकापासून एक भयंकर वादळ उठत आहे.”

  10. त्या दिवशी याहवेहने वधलेल्या लोकांनी पृथ्वी व्यापून जाईल—त्यांच्यासाठी कोणीही विलाप करणार नाही, अथवा मूठमाती देण्यासाठी त्यांची प्रेते कोणी गोळा करणार नाही. ते भूमीवर शेणाप्रमाणे पडून राहतील.

  11. ज्या खास्द्यांच्या नगरात तुम्हाला बंदिवान म्हणून नेण्यात आले आहे तिथे शांतता आणि समृद्धी नांदावी म्हणून प्रयत्न करा. खास्द्यांसाठी याहवेहकडे प्रार्थना करा, कारण तिथे समृद्धी आल्यास तुम्हासही समृद्धी लाभेल.”

  12. “ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’

  13. परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.

  14. याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?

  15. पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.

  16. “सणासाठी आमंत्रित केल्याप्रमाणे, तुम्ही माझ्याविरुद्ध संकटांना सर्व बाजूंनी बोलाविले. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी एकही मनुष्य निसटला नाही किंवा जिवंत राहिला नाही. ज्यांचे मी संगोपन केले आणि वाढविले, त्या सर्वांचा माझ्या शत्रूकडून नाश झाला आहे.”

  17. तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.

  18. ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

  19. ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.

  20. “ ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील.

  21. मी त्यांना आणि माझ्या डोंगराभोवती असलेल्या ठिकाणांना आशीर्वाद असे करेन. मी नेमलेल्या ऋतूत पाऊस पाडेन; आशीर्वादाची वृष्टी असेल.

  22. झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  23. ते यापुढे राष्ट्रांची लूट होणार नाहीत व हिंस्र पशू त्यांना फाडून खाणार नाहीत. ते सुरक्षिततेत राहतील आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही.

  24. आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले.

  25. त्यांच्या अशुद्धतेनुसार आणि पापांनुसार त्यांच्याशी व्यवहार केला आणि त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले.