मुख्य मजकुरावर जा

Nation बद्दल बायबलमधील वचने

183 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, “आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे.”

  2. “ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्‍यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.”

  3. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पुन्हा एकदा त्या नगरीतील परिपक्व वयाचे स्त्री व पुरुष यरुशलेमच्या रस्त्यांवर बसतील, प्रत्येकजण वयातीत असल्यामुळे आपल्या काठ्या टेकीत येतील,

  4. आणि नगरातील रस्ते तिथे खेळणार्‍या मुलांनी व मुलींनी भरून जातील.”

  5. मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.

  6. तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल.

  7. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

  8. अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.