Skip to content

Nation बद्दल बायबलमधील वचने

183 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय?

  2. मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.”

  3. “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.

  4. परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला.

  5. इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत.

  6. यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही.

  7. “तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, तुमच्यापैकी प्रत्येकाने उद्यासाठी स्वतःला शुद्ध करून घ्या, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: अहो इस्राएली लोकहो, तुमच्यामध्ये समर्पित केलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू काढून टाकेपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूपुढे उभे राहू शकणार नाही.

  8. “सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे.

  9. जो कोणी समर्पित केलेल्या वस्तूसह सापडेल त्याला, त्याच्याकडे असलेल्या सर्व वस्तूसह जाळून टाकावे. त्याने याहवेहचा करार मोडला आहे आणि इस्राएलमध्ये घृणास्पद कृत्य केले आहे.”

  10. दुसर्‍या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले.

  11. यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले.

  12. मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला.

  13. तेव्हा यहोशुआ आखानास म्हणाला, “माझ्या मुला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे गौरव कर आणि आपले पाप कबूल कर. तू काय केलेस ते मला सांग; माझ्यापासून काहीही लपवू नकोस.”

  14. तेव्हा आखानाने यहोशुआला उत्तर दिले, “खचितच मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. मी जे केले ते हे:

  15. लुटीमध्ये मी एक सुंदर शिनारी झगा आणि दोनशे शेकेल चांदी, पन्नास शेकेल सोन्याची लगड या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्या मला इतक्या हव्याशा वाटल्या की, मी त्या घेतल्या आणि त्या वस्तू माझ्या डेर्‍यात खाली जमिनीत पुरून ठेवलेल्या आहेत. झगा आणि सोने यांच्याहून चांदी सर्वात खाली पुरलेली आहे.”

  16. तेव्हा यहोशुआने संदेशवाहकांना पाठविले, त्यांनी तंबूकडे धाव घेतली आणि तिथे तंबूत खाली चांदीबरोबर ते सर्वकाही लपविले होते.

  17. त्यांनी तंबूतून त्या सर्व वस्तू घेतल्या व यहोशुआ व सर्व इस्राएली लोकांकडे आणल्या आणि याहवेहसमोर पसरवून ठेवल्या.

  18. मग यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी जेरहाचा पुत्र आखान व त्याच्याबरोबर, ती चांदी, तो झगा, ती सोन्याची लगड, त्याचे पुत्र, त्याच्या कन्या, त्याचे बैल, गाढवे, मेंढरे, त्याचा तंबू आणि त्याचे जे काही होते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.

  19. मग यहोशुआ आखानाला म्हणाला, “तू आमच्यावर अरिष्ट का आणलेस? आता याहवेह तुझ्यावर अरिष्ट आणतील.” मग इस्राएल लोकांनी त्याला धोंडमार केली व त्याच्या बरोबरच्या इतरांनाही धोंडमार केल्यावर त्यांनी त्यांना जाळून टाकले.

  20. आणि आखानावर दगडांची एक मोठी रास केली, जी आज देखील तिथे आहे. तेव्हा याहवेहचा कोप शांत झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणाला अखोरचे खोरे असे म्हटले जाते.

  21. याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले.

  22. योद्धे पुरुषांची गणती केल्यानंतर दावीदाचे मन त्याला टोचू लागले आणि त्याने याहवेहला म्हटले, “मी जे केले ते करून मी पाप केले आहे. तर आता हे याहवेह, मी आपणास विनंती करतो की आपल्या सेवकाचा दोष दूर करा; मी मूर्खपणा केला आहे.”

  23. दुसर्‍या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले:

  24. “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”

  25. तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”