Nation बद्दल बायबलमधील वचने: Peace of
Peace of बद्दल वचने
परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,
ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य.
याहवेह, तुमचा गौरव करण्याचे जे शिकले, आणि जे तुमच्या प्रकाशाच्या सानिध्यात चालतात, ते धन्य होत.
तुमच्या नामाची प्रशंसा ते दिवसभर आनंदाने करतात; आणि तुमच्या नीतिमत्तेचा उत्सव साजरा करतात.
तुम्हीच त्यांचे गौरव व सामर्थ्य आहात; तुमच्या कृपेद्वारे आमचे शिंग उच्च केले जाईल.
खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत, आणि आमचा राजादेखील इस्राएलचे पवित्र परमेश्वरच आहेत.