मुख्य मजकुरावर जा

Nation बद्दल बायबलमधील वचने: Peace given by God

7 वचने · 11 पैलू

Peace given by God बद्दल वचने

  1. याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले.

  2. तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.

  3. कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत.

  4. कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.

  5. ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात; ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात.

  6. प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ; युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.

  7. मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.