Skip to content

Miracles बद्दल बायबलमधील वचने

338 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.

  2. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”

  3. मग ज्या नगरांमध्ये सर्वात अधिक चमत्कार केले होते आणि तरीही त्यांनी पश्चात्ताप केला नाही, त्यांच्यावर येशूंनी टीका करण्यास सुरुवात केली.

  4. “खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर त्यांनी गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप केला असता.

  5. परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.

  6. हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत उंच केले जाईल काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील, कारण जी अद्भुत कृत्ये मी तुझ्यात केली ती सदोममध्ये केली असती तर सदोम आजपर्यंत अस्तित्वात असते.

  7. परंतु मी तुम्हाला सांगतो की न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.”

  8. परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.

  9. आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.

  10. तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले.

  11. “तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

  12. येशूंनी उत्तर दिले, “योनाहच्या पुत्रा शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे

  13. येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू इथून पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही.

  14. मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.

  15. अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली.

  16. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.

  17. हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”

  18. मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल.

  19. तुम्ही विश्वास ठेऊन आणि प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”

  20. ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.

  21. या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे.

  22. तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.”

  23. ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”

  24. तो मनुष्य उठला आणि लगेच अंथरूण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीही पाहिले नाही!”

  25. कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.