Miracles बद्दल बायबलमधील वचने: Were evidences of a divine commission
Were evidences of a divine commission बद्दल वचने
मोशेने उत्तर दिले, “जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही किंवा माझे ऐकले नाही आणि म्हणाले, ‘याहवेह तुला प्रकट झालेच नाही’ तर मी काय करावे?”
याहवेहने त्याला विचारले, “तुझ्या हातात काय आहे?” त्याने उत्तर दिले, “एक काठी!”
याहवेह त्याला म्हणाले, “ती जमिनीवर टाक.” मोशेने ती जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला आणि मोशे भिऊन त्यापासून दूर पळाला.
मग याहवेहने त्याला सांगितले, “हात लांब करून सापाचे शेपूट धर.” तेव्हा मोशेने त्या सापाला धरले आणि तो पुन्हा त्याच्या हातातील काठी झाला.
याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.”
मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.