Miracles बद्दल बायबलमधील वचने: Should produce obedience
Should produce obedience बद्दल वचने
याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी आणि नेहमी त्यांचे विधी, त्यांचे नियम आणि त्यांच्या आज्ञा पाळाव्यात.
तुम्ही आज हे स्मरणात ठेवा, तुमच्या मुलांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुशासन पाहिले नाही आणि त्याचा अनुभव केला नाही—त्यांचे गौरव, सामर्थ्यशाली हात व पसरलेल्या भुजांचा;
इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व देशाच्या समक्षतेत याहवेहने केलेली चिन्हे आणि केलेल्या गोष्टी;
मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि सांगितले: इजिप्त देशात फारोह, त्याच्या अधिकार्यांशी आणि त्याच्या देशात याहवेहने जे काही केले ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
तिथे ज्या महान पीडा आणि ते चिन्ह आणि जे महान चमत्कार केले, ते सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत.
म्हणून या कराराच्या अटींचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही जे सर्वकाही कराल त्यात तुम्ही समृद्ध व्हाल.