मुख्य मजकुरावर जा

Miracles बद्दल बायबलमधील वचने: Jesus was proved to be the Messiah by

8 वचने · 37 पैलू

Jesus was proved to be the Messiah by बद्दल वचने

  1. येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा:

  2. आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.

  3. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”

  4. ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्‍या कोणाची वाट पाहावी?”

  5. त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले होते आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली.

  6. तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.

  7. “माझी जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा वजनदार आहे. कारण जी कामे पूर्ण करण्याचे मला पित्याने सोपविले आहे, तीच कार्ये मी करीत आहे व ती साक्ष देतात की पित्यांनीच मला पाठविले आहे.

  8. “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली.