Skip to content

Miracles बद्दल बायबलमधील वचने

338 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!”

  2. लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते. येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”

  3. यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला.

  4. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.

  5. हे पाहून मुख्य याजकांनी लाजराला देखील जिवे मारण्याची योजना केली.

  6. यासाठी की अनेक यहूदी लोक लाजरामुळे येशूंवर विश्वास ठेवू लागले होते.

  7. ज्यांनी त्या चिन्हाबद्दल ऐकले होते, असे अनेक लोक येशूंना भेटण्यासाठी गेले.

  8. येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.

  9. मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे.

  10. जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.

  11. येशूंनी अनेक चिन्हे आपल्या शिष्यांदेखत केली, ती या पुस्तकात कथन केलेली नाहीत.

  12. परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे.

  13. “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली.

  14. एके दिवशी दुपारी तीन वाजता, प्रार्थनेची वेळ असल्यामुळे पेत्र आणि योहान मंदिरात जात होते.

  15. त्यावेळी जन्मापासून लंगडा असलेल्या एका मनुष्याला सुंदर नावे मंदिराच्या दरवाजाजवळ आणले जात होते, जिथे त्याला दररोज मंदिराच्या अंगणात जात असणार्‍यांकडे भीक मागण्यासाठी ठेवले जात होते.

  16. जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.

  17. तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!”

  18. त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेने त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले.

  19. परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”

  20. मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले.

  21. तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला.

  22. सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले,

  23. आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले.

  24. हे पाहून पेत्र त्या जमावाला म्हणाला: “अहो इस्राएली लोकांनो, याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काही कारण आहे का? आमच्याच शक्तीने किंवा सुभक्तीने या मनुष्याला चालावयास लावले आहे, अशा अर्थाने तुम्ही आम्हाकडे का पाहत आहात?

  25. येशूंच्या नावावरील विश्वासामुळे हा मनुष्य ज्याला आपण पाहता व ओळखता तो आता बलवान झाला आहे. येशूंच्या नावावरील विश्वासाद्वारे तो पूर्ण बरा झालेला आहे, हे तुम्ही सर्वजण पाहतच आहात.