मुख्य मजकुरावर जा

Miracles Wrought Through Servants of God बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 74 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी व माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी आमची रणशिंगे फुंकल्यानंतर तुम्हीही छावणीच्या सर्व बाजूंना तुमची रणशिंगे फुंका आणि मोठ्याने ओरडून म्हणा, ‘याहवेहसाठी व गिदोनासाठी.’ ”

  2. गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले.

  3. तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!”

  4. प्रत्येक व्यक्ती छावणीच्या सभोवताली आपल्या स्थानी उभे राहिले, सर्व मिद्यानी लोक पळू लागले, ते पळत असता मोठ्याने ओरडत पळाले.

  5. जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले.

  6. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला जेणेकरून त्याने आपल्या हाताने एखादी शेळी फाडावे त्याप्रमाणे त्याने त्या सिंहाचे जबडे फाडले. परंतु त्याबद्दल आपल्या वडिलांना किंवा आईला काहीही सांगितले नाही.

  7. नंतर याहवेहचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. तो खाली अष्कलोनला गेला, त्यांच्यापैकी तीस लोकांना मारले, त्यांच्याकडून सर्वकाही काढून टाकले आणि ज्यांनी कोडे समजावून सांगितले त्यांना त्यांचे कपडे दिले. रागाने पेटून तो आपल्या वडिलांच्या घरी परतला.

  8. मग तिथे त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले, त्याने ते उचलले आणि एक हजार पलिष्ट्यांस ठार केले.

  9. परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली.

  10. शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोकांवर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती.

  11. तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.

  12. जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.

  13. आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली.

  14. तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.

  15. गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”

  16. कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ ”

  17. ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे.

  18. एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.

  19. याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला.

  20. मग एलीयाहने मुलाला उचलून त्या खोलीतून खाली आणले. त्याने त्याला त्याच्या आईच्या हाती दिले आणि म्हटले, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!”

  21. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत.

  22. तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.

  23. आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.”

  24. म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.

  25. तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले. तो म्हणाला, “काही दिसत नाही.” सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.”