मुख्य मजकुरावर जा

Miracles Wrought Through Servants of God बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 74 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्‍याची दिशा बदलली व त्या वार्‍याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही.

  2. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला.

  3. मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले.

  4. मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले.

  5. तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.

  6. मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.”

  7. मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले.

  8. पाणी परत वाहू लागले व फारोहचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ—फारोहचे संपूर्ण सैन्य, ज्यांनी इस्राएली लोकांचा समुद्रामध्ये पाठलाग केला ते पाण्याखाली गेले. त्यांच्यातील एकही जिवंत राहिला नाही.

  9. तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या.

  10. होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.

  11. जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे.

  12. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

  13. आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले.

  14. त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल:

  15. जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही.

  16. परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”

  17. त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली

  18. आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.

  19. मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.

  20. तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.”

  21. तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.

  22. यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील.

  23. पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल.

  24. तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा.

  25. याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.”