मुख्य मजकुरावर जा

Gospel बद्दल बायबलमधील वचने

110 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या शुभवार्तेनुसार तो आता तुम्हाला स्थिर करेल व ज्या येशू ख्रिस्ताचा संदेश मी घोषित केला त्यानुसार जे रहस्य अनंत काळापूर्वी गुपित होते ते आता प्रकट झाले आहे.

  2. पण आता संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे प्रकट आणि जाहीर झालेली सार्वकालिक परमेश्वराची आज्ञा यांना अनुसरून सर्व गैरयहूदी लोकांनी विश्वासाने आज्ञापालन करावे.

  3. परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.

  4. परमेश्वराची मूर्खता मानवी शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञपणाची आहे, आणि परमेश्वराचा अशक्तपणा मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे.

  5. माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.

  6. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.

  7. तरी देखील, आम्ही परिपक्व झालेल्यांना ज्ञानाचा संदेश सांगतो, परंतु हे ज्ञान या युगाचे नव्हे किंवा या युगाचे शासक, ज्यांचे अधःपतन होणार आहे त्यांचेही नव्हे.

  8. आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे.

  9. कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो.

  10. मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.

  11. माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.

  12. आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात.

  13. या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे.

  14. नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.

  15. आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण होता, ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्‍या तेजामुळे इस्राएली लोकांना मोशेच्या चेहर्‍याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले.

  16. पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय?

  17. दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल!

  18. खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही.

  19. आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे.

  20. जरी आमची शुभवार्ता आच्छादिलेली असली, तर ती ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यापासूनच आच्छादिलेली आहे.

  21. या जगाच्या अधिपतीने विश्वासणार्‍यांची मने आंधळी केली आहेत, म्हणून शुभवार्तेचा प्रकाश जो ख्रिस्ताचे गौरव आणि परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो, ते पाहू शकत नाहीत.

  22. जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे.

  23. आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो.

  24. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  25. आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.