Skip to content

Fraternity बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्‍यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का?

  2. उलट एक विश्वासणारा मनुष्य त्याच्या बंधुवर फिर्याद करतो आणि ती ही विश्वास न ठेवणार्‍यांपुढे!

  3. तुम्हामध्ये खटले आहेत याचा अर्थ हाच की तुमचा पूर्णपणे पराजय झालेला आहे. त्याऐवजी तुम्ही अन्याय का सहन करत नाही? स्वतःची फसवणूक का करून घेत नाही?

  4. उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता!

  5. मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते.

  6. ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही.

  7. परंतु जो परमेश्वरावर प्रीती करतो, त्याला परमेश्वर ओळखतात.

  8. तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”

  9. कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत,

  10. तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.

  11. तरी हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; कित्येक लोकांवर मूर्तीचा प्रभाव अजूनही असल्यामुळे जेव्हा ते मूर्तीला अर्पिलेले अन्न सेवन करतात, तेव्हा ते परमेश्वराला अर्पिलेले आहे असे समजून खातात, त्यांचा विवेक दुर्बल असल्यामुळे विटाळतो.

  12. परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही.

  13. तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा.

  14. कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का?

  15. म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये.

  16. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध पाप करता व त्यांच्या दुबळ्या विवेकबुद्धीला इजा पोहोचविल्याने तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.

  17. यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.

  18. प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल.

  19. एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

  20. जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा.

  21. त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासणाऱ्या बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.

  22. कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची;

  23. ज्ञानात आत्मसंयमाची; आत्मसंयमात धीराची; धीरात सुभक्तीची;

  24. सुभक्तीत बंधुप्रेमाची; बंधुप्रेमात प्रीतीची.

  25. जर कोणी प्रकाशामध्ये आहे असा दावा करतो, परंतु आपल्या बंधू किंवा भगिनीचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधकारातच आहे.