Skip to content

Famine बद्दल बायबलमधील वचने

101 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.

  2. नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील.

  3. कारण अन्नाची व पाण्याची तूट पडेल. ते एकमेकांना पाहून घाबरतील आणि आपल्या पापामुळे नाश पावतील.

  4. जेव्हा मी तुझ्यावर दुष्काळाच्या घातक व नाशवंत बाणांनी वार करेन, ते मी तुझा नाश करण्यासाठी करेन. मी तुझ्यावर अधिक आणि अधिक दुष्काळ आणेन व तुझा अन्नपुरवठा संपुष्टात आणेन.

  5. मी तुझ्याविरुद्ध दुष्काळ आणि जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुला अपत्यहीन करतील. मरी व रक्तपात तुमच्यात असतील, आणि तुझ्याविरुद्ध मी तलवार आणेन. मी याहवेह हे बोललो आहे.”

  6. अहो, शेतकर्‍यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्‍यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत.

  7. द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.

  8. अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.

  9. त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील.

  10. आपल्या डोळ्यादेखत अन्न नाहीसे झाले नाही काय— आमच्या परमेश्वराच्या भवनातील सर्व आनंद व उल्हास गेले नाही काय?

  11. जमिनीच्या ढेकळांखाली बीज कुजून जात आहे. कोठारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि गोदामे मोडली आहेत, कारण धान्य करपून गेले आहे.

  12. गुरे कशी कण्हत आहेत! शेरडामेंढरांचे कळप व्याकूळ झाले आहेत, कारण त्यांना चरण्यासाठी कुरणेच नाहीत; मेंढ्यांचे कळप विव्हळत आहेत.

  13. हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत.

  14. आणि वनपशूदेखील तुमच्याकडे आक्रोश करीत आहेत, पाण्याचे झरे कोरडे पडले आहेत. आणि आणि अग्नीने रानातील कुरणे होरपळून निघाली आहे.

  15. “मी तुम्हाला प्रत्येक शहरात उपाशी पोटी ठेवले आणि प्रत्येक नगरात भाकरीची कमतरता केली, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.

  16. “हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.

  17. पाण्यासाठी लोक नगरोनगरी भटकले परंतु त्यांना पिण्यास पुरेसे मिळाले नाही, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.

  18. “मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

  19. यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात: “सर्व रस्त्यांवर विलाप होईल आणि प्रत्येक चौकात आक्रंदन होईल. तुमच्याबरोबर शोक करण्यासाठी शेतकर्‍यांनाही बोलाविले जाईल; रडण्यासाठी शोक करणार्‍यांना बोलाविले जाईल.

  20. प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल, कारण मी तुमच्यामधून जाईन,” असे याहवेह म्हणतात.

  21. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे.

  22. मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”

  23. मग कोकर्‍याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते.

  24. मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.”

  25. जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!”