Skip to content

Famine बद्दल बायबलमधील वचने

101 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”

  2. तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? आम्ही शांतीची आशा केली होती पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, आरोग्य मिळण्याच्या ऐवजी सर्वत्र दहशतच पसरली आहे.

  3. हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  4. तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका.

  5. या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.

  6. माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत.

  7. ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे बेशुद्ध होऊन पडत आहेत, त्यांच्या मातांच्या बाहूत या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत.

  8. हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख मी तुला काय म्हणू? मी तुझी तुलना कशाशी करू? मी तुला कोणा समान लेखू? जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? हे सीयोनच्या कुमारी कन्ये? तुझा घाव सागराएवढा खोल आहे. तुला कोण बरे करू शकेल?

  9. तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते.

  10. वाटेने जाणारे सर्व वाटसरू तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; यरुशलेमकन्ये. तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, “सौंदर्याची परिपूर्णता, संपूर्ण पृथ्वीचा आनंद असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?”

  11. तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध त्यांचे मुख मोठे रुंद उघडले आहे; दात खाऊन रागाने फुत्कार टाकीत ते म्हणतात, “आपण अखेरीस तिला गिळंकृत केले. या दिवसाची आम्ही किती वाट पाहत होतो; ते बघण्यास आपण जिवंत आहोत.”

  12. याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.

  13. लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.

  14. उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.

  15. याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?

  16. पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.

  17. “सणासाठी आमंत्रित केल्याप्रमाणे, तुम्ही माझ्याविरुद्ध संकटांना सर्व बाजूंनी बोलाविले. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी एकही मनुष्य निसटला नाही किंवा जिवंत राहिला नाही. ज्यांचे मी संगोपन केले आणि वाढविले, त्या सर्वांचा माझ्या शत्रूकडून नाश झाला आहे.”

  18. तहानेमुळे शिशूंच्या जिभा टाळूला चिकटल्या आहेत; भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत, पण त्यांना कोणीही देत नाही.

  19. उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.

  20. माझ्या लोकांची शिक्षा सदोमापेक्षाही घोर झाली आहे, ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी त्यांचा एका क्षणात नायनाट झाला.

  21. त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.

  22. पण आता ते चेहरे काजळीपेक्षा काळेकुट्ट झाले आहेत; त्यांना वाटेत कोणी ओळखू शकत नाही. त्यांची कातडी हाडांना चिकटली आहे; ती काठीसारखी शुष्क झाली आहे.

  23. उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा तलवारीने मरणारे फार बरे; कारण शेतातील उपज नसल्यामुळे भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात.

  24. करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने आपलीच मुले-बाळे शिजविली, जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, ती त्यांचे अन्न बनली.

  25. पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते; किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही.