मुख्य मजकुरावर जा

Famine बद्दल बायबलमधील वचने: Want of seasonable rain

4 वचने · 51 पैलू

Want of seasonable rain बद्दल वचने

  1. अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला.

  2. “यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत.

  3. त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात.

  4. जमिनीला भेगा पडल्या आहेत कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; शेतकरी घाबरले आहेत म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात.