Skip to content

Famine बद्दल बायबलमधील वचने

101 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ऐश्वर्यसंपन्न असल्यामुळे जिने आपला तळवाही कधी जमिनीला लावला नाही अशी घरंदाज व कोमलहृदयी पत्नी इतकी कठोरहृदयी बनेल की आपला प्राणप्रिय पती, पुत्र किंवा कन्या यांना ती आपल्या अन्नाचे वाटेकरी होऊ देणार नाही,

  2. आपल्याच पोटचा गर्भ व आपल्याच पोटची मुले स्वतःलाच गुप्तपणे खाता यावी म्हणून ती लपवून ठेवील. अशाप्रकारे या वेढ्याच्या काळातील भूक खूप भयानक असेल आणि तुमच्या शत्रूकडून तुम्हाला तुमच्याच वेशींच्या आत भयंकर संकट व यातना भोगाव्या लागतील.

  3. ते नद्या आटवून त्यांचे वाळवंट करतात, आणि झरे आटवून त्यांची कोरडी भूमी करतात;

  4. आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी, त्यांच्या चांगल्या भूमीचे ते क्षारभूमीत रूपांतर करतात.

  5. आता बघा, प्रभू सर्वसमर्थ याहवेह यरुशलेम व यहूदीयाचा अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,

  6. वीर योद्धे तथा सैनिक, न्यायाधीश आणि संदेष्टे, दैवप्रश्न करणारे आणि वडीलजन,

  7. पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी, सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत.

  8. “मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन; बालके त्यांच्यावर राज्य करतील.”

  9. लोक एकमेकांवर अत्याचार करतील— पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.

  10. एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, आपल्या भावास धरून म्हणेल, “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!”

  11. पण त्या दिवशी तो ओरडेल, “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; मला लोकांचा पुढारी बनवू नका.”

  12. यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.

  13. दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते. ती काटेरी झुडपे आणि काटेरी झाडे यांना भस्म करते, ती झाडेझुडपांचे रान पेटवून टाकते, त्यामुळे तो धुराचा एक स्तंभ होऊन गरगर फिरत वर जातो.

  14. सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने भूमी होरपळून जाईल आणि लोक त्या आगीचे इंधन होतील; ते एकमेकांना वाचविणार नाहीत.

  15. उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील परंतु ते भुकेले राहतील; डाव्या बाजूला असलेलेही खातील परंतु समाधानी होणार नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस खातील:

  16. मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  17. अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला.

  18. “यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत.

  19. त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात.

  20. जमिनीला भेगा पडल्या आहेत कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; शेतकरी घाबरले आहेत म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात.

  21. हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही.

  22. रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; अन्नाशिवाय त्यांची नजर निस्तेज झाली आहे.”

  23. म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.

  24. आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.

  25. “हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.