Skip to content

Covenants बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते.

  2. तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.

  3. परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्‍यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. संपूर्ण सभेने पुढार्‍यांविरुद्ध कुरकुर केली,

  4. परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.

  5. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे.

  6. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”

  7. तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

  8. “तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.”

  9. शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”

  10. तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल.

  11. माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”

  12. याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.

  13. आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला.

  14. जे माझा सल्ला न घेता इजिप्तकडे जातात; जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात.

  15. परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल, इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.

  16. जरी सोअनमध्ये त्यांचे अधिकारी आहेत आणि त्यांचे दूत हानेस येथे पोहोचले आहेत,

  17. तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत, जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत. परंतु केवळ लज्जा आणि अपमान.”